Chili Crop Schedule in Marathi

पाटील बायोटेक

मिरची क्रॉप शेड्यूल
सुधारित आवृत्ती: मे 2025

पिकामध्ये काही अडचण किंवा समस्या असल्यास व्हाट्सअप करा: 7507775355

मिरची व शिमला मिरची लागवड माहिती

रोजच्या आहारात मिरची ही अत्यावश्यक असते. बाजारात हिरव्या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्टरी क्षेत्रावर होते. महाराष्ट्रातील एकूण मिरची लागवडीपैकी 68 टक्के क्षेत्र नांदेड, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत आहे. मिरचीमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने तिचा संतुलित आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. मिरचीचा औषधी उपयोगही होतो.

हवामान

उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामांत करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फुलांची गळ जास्त होते. तसेच पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस चांगला असतो. मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते, आणि उत्पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे व फुले गळ मोठ्या प्रमाणात होते आणि उत्पन्नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.

जमीन

पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या ते मध्यम भारी जमिनीत मिरचीचे पीक चांगले येते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरल्यास मिरचीचे पीक चांगले येते. पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरचीचे पीक घेऊ नये. पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पीक चांगले येते.

हंगाम आणि लागवडीची योग्य वेळ

मिरची हे पीक तिन्हीही हंगामात घेता येते.

  • खरीप: 15 मे ते 30 जुलै
  • रब्बी: ऑक्टोबर, नोव्हेंबर
  • उन्हाळी: जानेवारी, फेब्रुवारी, मार्च

खरीप पिकाची लागवड जून, जुलै महिन्यात आणि उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी.

लागवड पद्धत

बियाणे थेट जमिनीमध्ये किंवा नर्सरीमध्ये (पोत) लावून रोपे तयार करता येतात. रोपे तयार झाल्यावर, त्यांची लागवड करतात. रोपांची लागवड करताना, योग्य अंतर ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे प्रत्येक रोपाला हवा आणि सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो. हवामानानुसार आणि प्रदेशानुसार लागवडीचा योग्य वेळ ठरतो.

आंतरमशागत

मिरचीच्या रोपांच्या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यानंतर तणांच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडीनंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यावी. बागायती पिकांच्या बाबतीत, रोपांच्या लागवडीनंतर 2 महिन्यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

पाणी व्यवस्थापन

मिरचीला नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे.

व्हरायटीची निवड

मिरचीचे प्रामुख्याने 3 प्रकार: तेजा 4 सेगमेंट, बलराम सेगमेंट, पिक्याडोर सेगमेंट.

शिमला मिरचीचे प्रकार: हिरवी शिमला मिरची सेगमेंट, कलर शिमला मिरची सेगमेंट.

साधी मिरची (संकरित जाती): सेमीनिस एस व्हि एच ए 1452, सितारा गोल्ड, व्हि एन आर 277, हायव्हेज प्राइड, गौरी, ईगल, बी ए एस एफ - आर्मर, नंदिता, लाली, ऍडव्हांटा - ए के 47, नेत्रा ऍस्टन, अनुष्का, नॉनवू सीड्स ज्वेलरी, क्रीजा लालपरी, नामधारी. तसेच, एन एस 2572, अंकुर -2121, कलश तलवार, अग्निज्वाला, स्टार फील्ड शार्क 1, रेट्रो सीड्स महिष्मती, महिको नवतेज, तेजा - 4, नामदेव - ओमेगा, हेन्सीटा सीड्स अदिरा.

शिमला मिरची (जाती): सिंजेंटा - इंद्रा, पॅलॅडिन, कामोस, ब्रोकन, क्लाउस अंबिका, आशा, इंडस 11 पोपटी, इन्स्पिरेशन आर झेड (रेड), बचाटा आर झेड (येलो), युकसेल अब्राहम एफ १ (Red), रेहेना एफ १ (Yello).

रोपे कसे तयार करावे?

रोपे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • 104 कॅव्हिटी प्लास्टिक ट्रे
  • कोकोपीट / पीटमॉस
  • बियाणे

जवळपासच्या चांगल्या नर्सरीतूनच रोपे बुक करावीत. पाटील बायोटेक टिश्यूकल्चर लॅबमधून रोपे बुक करण्यासाठी 8080677492 या नंबरवर संपर्क करावा.

जमिनीची मशागत

मशागतीपूर्वी 3 - 4 टन शेणखत पसरून जमिनीची उभी-आडवी नांगरट करून कुळवणी / वखरणी करावी किंवा रोटावेटर मारून संपूर्ण जमीन भुसभुशीत करावी. 4/5 फुटाचे बेड तयार करून बेसल डोस द्यावा.

शेणखताचा खुराक कसा तयार करावा?

ट्रायकोगार्ड - 1 किलो + वामीझोन 100 ग्रॅम + एनपीके कॉन्सो 1 लिटर + डी कोम्पो 1 लिटर. हे मिश्रण 200 लिटर पाण्यात स्लरी तयार करून शेणखतावर शिंपावे (प्रमाण 1 ट्रॉलीसाठी).

लागवडीचे अंतर

शिमला मिरची: शिमला मिरचीसाठी शेडनेट आवश्यक आहे.

  • बेडची रुंदी: 3 फुट
  • ड्रिप: 4/5 फुट
  • झाडांमधील अंतर: 2 फुट
  • दोन ओळीतील अंतर: 2 फुट

मिरची:

  • बेडची रुंदी: 3 फुट
  • ड्रिप: 4 फुट
  • झाडांमधील अंतर: 2 फुट
  • दोन ओळीतील अंतर: 2 फुट

लागवडीचे अंतर 4 बाय 1.5/2 फुट किंवा 5 बाय 1.5/2 फुट झिगझेंग प्रत्येक बेडवर असावे. बेसल डोस टाकून बेडवर मल्चिंग पेपर टाकावा.

एकरी रोपांची संख्या (अंतरानुसार):

अ. क्र. पिकाचे नाव दोन ओळीतील अंतर दोन रोपतील अंतर एकूण अंतर एकूण क्षेत्रफळ रोपांची संख्या
1 शिमला मिरची 5 X 2 10 फुट सिंगल ओळ $43560 \div 10$ $=4356 \times 14$
2 शिमला मिरची 5 X 2 10 फुट डबल ओळ $43560 \div 5$ = 8712 रोपे
3 साधी मिरची 4 X 2 8 फुट सिंगल ओळ $43560 \div 8$ = 5445 रोपे
4 साधी मिरची 4 X 2 8 फुट डबल ओळ $43560 \div 4$ = 10890 रोपे

मल्चिंग पेपर लावणे गरजेचे आहे का?

  • नवीन संकरित जातींचे उत्पादन मल्चिंग पेपरशिवाय घेणे आता शक्य नाही.
  • मल्चिंग पेपरमुळे पाण्याची मोठी बचत होते.
  • सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आद्रता टिकून राहिल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ जोमदार होते व ती टिकून राहते.
  • तणांचे नियंत्रण होते.
  • अति पाऊस व पाण्याचा ताण दोन्ही ठिकाणी मल्चिंग पेपर आवश्यक आहे.

ब्लॅक अँड व्हाइट मल्चिंग पेपरची निवड करावी.

भविष्यात मर रोग येऊ नये म्हणून उपाय:

ट्रायकोगार्ड - 250 ग्रॅम + ह्युमॉल गोल्ड - 50 ग्रॅम + वामीझोन - 50 ग्रॅम + एनपीके कॉन्सो - 250 मि.लि.. हे मिश्रण 50 लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्यात रोपे बुडवावीत, मग लागवड करावी.

बेसल डोस काय व कोणता घ्यावा?

मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे बेड तयार करताना 16 महत्त्वाचे अन्नद्रव्य बेडवर मिक्स करणे आवश्यक आहे. बेसल डोसमध्ये खालील अन्नघटक असणे गरजेचे आहे: स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, बोरॉन, मँगेनीज, मॉलीब्डेनम, निंबोळी पेंड, हुमॉल (हॉर्टिकल्चर स्पेशल), शक्य असल्यास गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले शेणखत. यापूर्वी नेमॅटोड अथवा हुमणी यांचा प्रादुर्भाव असल्यास यांच्या नियंत्रणासाठी जैविक अथवा रासायनिक घटक मल्चिंगच्या खाली टाकणे गरजेचे आहे.

खत व्यवस्थापन

टप्पा (लागवडीनंतर) उपाय / मात्रा
लागवडीच्या अगोदर द्यावयाचा डोस / मात्रा डीएपी 100 कि.ग्रॅ. किंवा सुपर फॉस्फेट 250 कि.ग्रॅ. + 10:26:26 50 कि.ग्रॅ. + एमओपी 50 कि.ग्रॅ. ह्यूमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 कि.ग्रॅ. + रिलीजर 5 कि.ग्रॅ. + निम पावडर 100 कि.ग्रॅ. + एनपीके कॉन्सो जी 25 कि.ग्रॅ. प्रति एकर वापरावे. (एनपीके कॉन्सो जी ची बॅग मिळाल्यास 30 - 40% खतांची मात्रा कमी करू शकतात). शेणखताचा खुराक बनविला असल्यास बेसल डोस देण्याची गरज नाही.
बेड तयार झाल्यावर लगेच लागवडीपूर्वी / लागवडीनंतर 3 ते 5 दिवसात दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता येऊ नये यासाठी: मायक्रोडिल किट - 23 कि.ग्रॅ. 200 लिटर पाण्याचे द्रावण तयार करून ड्रीपने सोडावे. टाकलेल्या खताचे विघटन होऊन पिकाला उपलब्ध होण्यासाठी: एनपीके कॉन्सो - 1 लि. + वामीझोन - 100 ग्रॅ. गुळ 2 किलो 200 लि. पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी प्रति एकर ड्रिपने सोडणे.
10 दिवसांनी (आळवणी) सुरुवातीला पिकाची वाढ होण्यासाठी: 19:19:19 - 3 कि.ग्रॅ. + ह्यूमॉल गोल्ड - 500 ग्रॅ. प्रति 100 लि. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
18 दिवसांनी (आळवणी) मर रोग येऊ नये यासाठी: ट्रायकोगार्ड - 1 कि.ग्रॅ. 100 लि. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
25 दिवसांनी (आळवणी) फुटवे व जोमदार होण्यासाठी: अमृत किट - 1 + 19:19:19 - 3 कि.ग्रॅ. 200 लि. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे. (टीप: अमृत किट विद्राव्य खतासोबत न देता सेपरेट सोडावी).
30 दिवसांनी (आळवणी) खोड मजबूत होण्यासाठी: फॉसिड - 1.50 कि.ग्रॅ. + ह्यूमॉल जेली 1 कि.ग्रॅ. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
40 दिवसांनी (डोस / मात्रा) जास्त फुले व वाढ सुरू राहण्यासाठी: अमृत किट 1 + 12:61:00 - 5 कि.ग्रॅ. 200 लि. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे. (टीप: अमृत किट विद्राव्य खतासोबत न देता सेपरेट सोडावी).
50 दिवसांनी (आळवणी) व्हायरस येऊ नये म्हणूनः अरेना 80 ग्रॅ. + 13:40:13 - 5 कि.ग्रॅ. + ह्यूमॉल - 1 लि. + मायक्रोडिल सुपर मिक्स 500 ग्रॅ. 200 लि. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
60 दिवसांनी (आळवणी) जास्त फुटवे व काळोखी टिकून राहण्यासाठी: ऑक्सीजन 1 लि. + मायक्रोडिल - 5 लि. 200 लि. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
75 दिवसांनी (आळवणी) पिकाची मूळे अॅक्टिव्ह राहण्यासाठी: ह्यूमॉल गोल्ड 500 ग्रॅ. + 00:52:34 - 5 कि.ग्रॅ. 200 लि. पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
85 दिवसांनी (आळवणी) जास्त फुलधारणा होण्यासाठी: फोलिबिऑन 1 लिटर + 12:61:00 - 5 कि.ग्रॅ. + इमिडा - 200 मि.लि. 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
90 दिवसांनी (आळवणी) टाकलेल्या खताचे विघटन होऊन पिकाला उपलब्ध होण्यासाठी: एनपीके कॉन्सो - 1 लिटर + वामीझोन 100 ग्रॅ. गुळ 2 किलो 200 लिटर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी प्रति एकर ड्रिपने सोडणे.
110 दिवसांनी (आळवणी) पिकातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी: कॅलनेट लिक्विड - 1 लि. + 13:00:45 - 5 कि.ग्रॅ. 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिप मधून सोडणे.
130 दिवसांनी (आळवणी) वाढ व फुलधारणा सुरू ठेवण्यासाठीः ऑक्सिजन 1 लि. + 12:61:00 - 5 कि.ग्रॅ. 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
145 दिवसांनी (आळवणी) रोग प्रतिकार क्षमता व फुटवे वाढण्यासाठीः अमृत किट 1 नग + ह्यूमॅग 5 कि.ग्रॅ. 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे. (टीप: अमृत किट विद्राव्य खतासोबत न देता सेपरेट सोडावी).
160 दिवसांनी (आळवणी) पानगळती व पिवळेपणा दूर करण्यासाठीः फोलिबियॉन 500 मि.लि. + 00:52:34 - 5 कि.ग्रॅ. + मायक्रोडिल सुपर मिक्स 500 ग्रॅ. 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
175 दिवसांनी (आळवणी) फोलिबिऑन - 1 लिटर + 00:00:50 - 3 कि.ग्रॅ. 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.
190 दिवसांनी (आळवणी) टाकलेल्या खताचे विघटन होऊन पिकाला उपलब्ध होण्यासाठी: एनपीके कॉन्सो 1 लि. + वामीझोन 100 ग्रॅ. गुळ 2 कि.ग्रॅ. 200 लिटर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी प्रति एकर ड्रिपने सोडणे.
200 दिवसांनी (आळवणी) के सर्ज 200 ग्रॅ. + ह्यूमॉल गोल्ड 1 कि.ग्रॅ. 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति एकर आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडणे.

बुरशी का होते किंवा रोग का येतात?

कुठल्याही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होताना खालील घटक कारणीभूत ठरतात:

  • हवेतील आर्द्रता
  • जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव
  • वातावरणामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव
  • रोगट पिकाचे अवशेष
  • परिसरामध्ये इतर पिकांवर असणारे रोग
  • झाडाला झालेल्या जखमा
  • अन्नद्रव्यांची कमतरता

नेमॅटोड कसा नियंत्रित करावा?

नेमॅटोड नियंत्रित करण्यासाठी दोन पर्याय आहेत:

  1. **जैविक:** पॅसिलोमायसिस लिलासीनस (Paecilomyces lilacinus 1.0% WP) - नेमाटोगार्ड - 500 ग्रॅम प्रति एकर सोडावे.
  2. **रासायनिक:** वेलमप्राइम (Fluopyrum 34.48%) - 500 मि.लि. प्रति एकर सोडावे.

मिरची जास्त दिवस कशी चालू राहील?

बऱ्याच वेळा अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना बाजारभावानुसार अन्नद्रव्यांचे प्रमाण किंवा खतांचे डोस कमी किंवा जास्त केले जातात. परंतु, पाऊस, वादळ, किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे भाजीपाल्यांचे बाजारभाव कमी किंवा जास्त होत असतात. म्हणून अशा पिकांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना उत्पन्नांवर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. उदा. मिरची हे पीक 6 ते 8 महिने कमीत कमी शेतामध्ये राहते. म्हणून बेसल डोस पासून ते 6 व्या महिन्यापर्यंत रासायनिक खते तसेच विद्राव्य खते यांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे आणि हे सर्व पाटील बायोटेकच्या वेळापत्रकामध्ये समाविष्ट केलेले आहे.

रोग नियंत्रण कसे करावे?

रोग व कीड नियंत्रण करताना सर्वात आधी रोगांची व किडीची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच रोग व कीड येण्याचा वेळ, त्याची लक्षणे आणि उपाय योजना याचा मास्टरप्लॅन आपल्याकडे असला पाहिजे.

रोगाचे नाव उपाययोजना
डैम्पिंग ऑफ रोग / फ्यूजेरियम विल्ट रिडोमिल गोल्ड - 50 ग्रॅ + डॉक्टर प्लस 50 ग्रॅ. + ह्यूमॉल गोल्ड 50 ग्रॅ. प्रति 15 लिटर पंपाने खोडावर ड्रेचिंग करावी.
चोएनेफोरा ब्लाइट / वेट रॉट नेटीव्हो - 20 ग्रॅ. + ऑक्सीजन 50 मि.लि. + ब्लेझ 15 मि.लि किंवा ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
सर्कोस्पोरा कुप्रोफिक्स - 50 ग्रॅ. किंवा कोनिका 30 ग्रॅ. + ऑक्सीजन 50 मिली + ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
बॅक्टेरियल लीफ स्पॉट **उपाय 1:** ब्ल्यु कॉपर - 50 ग्रॅ. + स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्रॅ. किंवा कोनिका- 30 ग्रॅ. + फॉलिबियॉन - 40 मि.लि. + ब्लेझ सुपर 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे. **उप उपाय 2:** कॉपर हायड्रोक्साईड - 50 ग्रॅ. + कासू बी 30 मि.लि. + ऑक्सिजन - 50 मि.लि. + ब्लेझ - 15 मि.लि. किंवा ब्लेझ सुपर 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
अल्टरनेरिया लीफ स्पॉट **उपाय 1:** ब्ल्यु कॉपर - 50 ग्रॅ. + स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्रॅ. किंवा कोनिका 30 ग्रॅ. + फॉलिबियॉन - 40 मि.लि. + ब्लेझ 15 मि.लि. किंवा ब्लेझ सुपर 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे. **उपाय 2:** कॉपर हायड्रोक्साईड - 50 ग्रॅ. + कासू बी 30 मि.लि. + ऑक्सिजन - 50 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
भुरी निसोडियम 12 मि.लि. + ऑक्सीजन - 50 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
डाय बॅक लस्टर - 30 मि.लि. + फोलीबियोन 40 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.

कीड नियंत्रण

किडीचे नाव उपाययोजना
लीफ कर्ल व्हायरस (चुरडा-मुरडा, बोकड्या), पांढरी माशी, थ्रिप्स, लाल व पिवळे कोळी, मावा **उपाय 1:** सिंघम - 30 मि.लि. + कडूराजा 10 मि.लि. + अरेना गोल्ड 50 ग्रॅ. + फोलिबि यॉन - 40 मि.लि. + ब्लेझ सुपर 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंप 3 दिवसानंतर लगेच फवारणी करावी. **उपाय 2:** पोलिस - 10 ग्रॅ. + कडूराजा 10 मि.लि. + अरेना गोल्ड 50 ग्रॅ. + ऑक्सिजन - 50 मि.लि. + ब्लेझ सुपर-5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
पाने खाणारी अळी (सपोडओपतेरा लितूरा), फळ पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा आर्मीजेरा) **उपाय 1:** डेलिगेट - 20 मि.लि. + ऑक्सीजन 50 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे. **उपाय 2:** पोकलैंड - 25 मि.लि + ऑक्सिजन 50 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
लाल कोळी सीजमाईट - 40 मि.लि. + ऑक्सिजन 50 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
ब्लॅक थ्रिप्स कडू राजा 10 मि.लि. + सीमोडिस 24 मि.लि. प्रति पंप 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे.
नागअळी मक्षिकारी टोमॅटो कॅप्चर प्रति एकर 15 ट्रॅप लावावे.

इतर समस्या आणि उपाय: अन्नद्रव्याची कमतरता

कॅलनेट - 3 लि. + बोरॉन 500 ग्रॅ. प्रति एकर ड्रीपने सोडा.

फवारणी व्यवस्थापन

टप्पा (लागवडीनंतर) उपाय / मात्रा (प्रति 15 लिटर पंप पाण्यात)
5 दिवसांनी रोपांची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीः साफ - 50 ग्रॅ. + सुपर कॉन्फिाडॉर - 8 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि..
12 दिवसांनी व्हायरस येऊ नये म्हणूनः अॅन्ट्राकॉल 50 ग्रॅ. + सिंघम 25 मि.लि. + मायक्रोडिल सुपर मिक्स - 30 ग्रॅ. + अरेना 6 ग्रॅ. + ब्लेझ सुपर 5 मि.लि..
21 दिवसांनी पिकाची रोगप्रतिकार क्षमता व फुटवे वाढीसाठी: रिडोमिल गोल्ड- 40 ग्रॅ. + ऑक्सीजन - 50 मि.लि. + ह्यूमॅग - 100 ग्रॅ. + बेनेव्हिया 25 मि.लि. + ब्लेझ सुपर 5 मि.लि..
30-35 दिवसांनी (कीडी व व्हायरस नियंत्रण) अरेना गोल्ड 50 ग्रॅम + मायक्रोडिल सुपर मिक्स - 30 ग्रॅ. + उलाला 8 ग्रॅ. + अरेना गोल्ड 30 ग्रॅ. + ब्लेझ सुपर- 5 मि.लि. प्रति एकर.
30-35 दिवसांनी (डाउणी व अळी नियंत्रण) अमिस्टर टॉप 25 मिली + ऑक्सिजन - 50 मि.लि. + पोकलैंड - 25 मि.लि. + ब्लेझ सुपर 5 मि.लि..
40-45 दिवसांनी (डाउणी व अळी नियंत्रण) अमिस्टर टॉप 25 मिली + ऑक्सिजन - 50 मि.लि. + पोकलैंड - 25 मि.लि. + ब्लेझ सुपर 5 मि.लि..
50 - 55 दिवसांनी (भुरी नियंत्रण) निसोडियम 12 मि.लि. + फोलिबिऑन - 40 मि.लि. + मायक्रोडिल झिंक - 25 ग्रॅ. + ब्लेझ सुपर 5 मि.लि..
60 - 65 दिवसांनी (भरपूर फुल व फळ धारणेसाठी) डावणी व जास्त फुलधारणेसाठीः अवतार - 40 ग्रॅ. + 12:61:00 - 100 ग्रॅ. + पोकलैंड - 25 मि.लि. + झकास - 7 मि.लि. + ब्लेझ सुपर 5 मि.लि. प्रति एकर.
70 - 75 दिवसांनी (बुरशीजन्य रोग नियंत्रण) ट्रायकलर 20 मि.लि. + फोलिबिऑन - 40 मि.लि. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि..
80-85 दिवसांनी (थ्रीप्स नियंत्रण) कस्टोडिया 20 मि.लि. + ऑक्सिजन 50 मि.लि. + पोलिस - 6 ग्रॅ. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि..
90 - 95 दिवसांनी (व्हायरस व अळी नियंत्रण) पोकलैंड 25 मि.लि. + अरेना गोल्ड - 50 ग्रॅ. + ब्लेझ सुपर - 5 मि.लि..