"टपोरा हरभरा", "भरगोस उत्पादन" येणार कसं?
हरभरा हमखास नफा देतो हे आपण जाणतोच. अश्या वेळी तो नफा कसा वाढेल? इतर पिकांमध्ये झालेले नुकसान भरून काढत, खिशात काही पैसा शिल्लकी कसा पडेल? हा तुमच्या मनातला निरंतर प्रश्न आहे. तो योग्यच आहे व त्यावर काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
हरभऱ्यातील मर आणि अळी या समस्यांवर पाटील बायोटेकचे ट्रायकोगार्ड आणि पोकलँड उपयोगी आहेत. ही दोघी उत्पादने समस्या टाळायला मदत करतात तेव्हा त्यांचा उपयोग आपण अनुक्रमे बीज प्रक्रियेत व फुलोरा अवस्था शेवटच्या टप्प्यात आल्यावर न चुकता करावा. ही उत्पादने आपल्या पिकाची उत्पादकता कमी होणार नाही याची काळजी घेतील, यात शंका नाही.
हरभरा हमखास नफा देतो हे आपण जाणतोच. अश्या वेळी तो नफा कसा वाढेल? इतर पिकांमध्ये झालेले नुकसान भरून काढत, खिशात काही पैसा शिल्लकी कसा पडेल? या प्रश्नाचे सूचक उत्तर देणारा हा लेख, नक्की वाचा!
पण इथे आपण हरभरा "टपोरा व भरगोस" यावा या साठी काय करावे? यावर चर्चा करू. त्यासाठी पिकाची वाढ चांगली होणे गरजेचे आहे. त्यास भरपूर फांद्या व उपफांद्या याव्यात, फुलांची संख्या वाढावी, फुलगळ होऊ नये, फुलाचे रूपांतर घाट्यात होऊन त्यात दाणे चांगले पोसले जाणे महत्वाचे आहे.
त्यासाठी मुळांची भरगोस वाढ होणे, अवशोषण वाढवून अन्नद्रव्यांचा आपटेक चांगला होणे गरचे आहे. मुळांची ठेवण व वाढ सुधरुढ असल्यास पिकाला आवश्यक 17 घटक संतुलित मात्रेत मिळतात व पिके चांगली वाढतात, त्यास भरपूर फांद्या, उपफांद्या येऊन फुलोरा चांगला बसतो.
मुळांची भरगोस वाढ होण्यासाठी मृदेत ह्युमस हा घटक महत्वाचा आहे. ह्युमस हा घटक विघटन या प्रक्रियेतून हळूहळू तयार होत असतो. सेंद्रिय घटक मातील मिसळल्यावर त्यापासून ह्युमस तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतात.
सुदैवाने लिओनार्डाइट या खनिजावर प्रक्रिया करून हयूमिक एसिड मिळते ज्यात ह्युमसचे सर्व गुणधर्म असतात व त्याचा वापर केल्याने मुळांची भरगोस वाढ होऊन अन्नद्रव्यांचा आपटेक चांगला करता येतो.
पाटील बायोटेक च्या ह्युमॉल या उत्पादनाला 27 वर्षांची गुणवत्ता व उपयोगीतेची परंपरा आहे.
फुलोरा चांगला आल्यावर पिकास कॅल्शियम या घटकांची सर्वात अधिक गरज असते. हा घटक पेशीतील पेशीभित्तिका मजबूत करतो ज्यामुळे फुलांचे देठ चांगले होतात व फुलगळ टळते. आता या फुलांचे रूपांतर घाट्यात होऊन दाणे भरण्याची प्रक्रिया चांगली होणे गरजेचे असते. जिप्सम व चुन्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, दुर्दैवाने त्यातील कॅल्शियम पाण्यात विरघळत नाही व त्याचा आपटेक ही हवा तितक्या प्रमाणात व वेगात होत नाही.
यासाठी पाण्यात विरघळणारे कॅल्शियम नायट्रेट हे खत अत्यंत उपयोगी ठरते. यातील नायट्रेट व अमिनो स्वरूपातील नत्र कॅल्शियमच्या सह-अवशोषणाला उद्यपित करते. फुलोरा अवस्थेत कॅल्शियम नायट्रेट दिल्याने फुलोरा टिकून राहण्यास व त्याचे रूपांतर घाट्यात होण्यास मदत मिळते. यात एक लक्षात घ्यायची अतिशय महत्वाची बाब अशी आहे की रासायनिक कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम नायट्रेट खत यात थोडे अंतर असते. कॅल्शियम नायट्रेट या रसायनात अमोनियम नायट्रेट हा घटक समाविष्ट केल्यावर कॅल्शियम नायट्रेट खत तयार होते. रासायनिक कॅल्शियम नायट्रेट पीक चांगल्या पद्धतीने शोषू शकत नाही.
पाटील बायोटेकच्या कॅलनेट या उत्पादनाला 25 वर्षांची परंपरा आहे. सर्व पिकात याचा उपयोग होतो.
हरभरा प्रोटीन युक्त असतो. प्रोटीन म्हणजेच प्रथिने. ही प्रथिने म्हणजे अमिनो एसिड ची एक साखळी असते व साखळीतील प्रथिनांचा क्रम व तिची होणारी घडी यावरून वेगवेगळी प्रथिने ओळखली जातात व त्यांचे कार्य ठरते.
पेशी ची तुलना कारखान्याशी केल्यास प्रथिन म्हणजे कारखान्याच्या भिंतीतील दगड-वीट व कारखान्यात खडखड करणारी मशीनरी! या तुलनेतून आपणास प्रथिनांचे महत्व लक्षात येते. अश्या महत्वाच्या प्रथिन या घटकांच्या निर्मितीच्या पाया भरणीत सल्फर हा घटक सर्वात महत्वाचा आहे कारण या घटका शिवाय प्रथिन साखळीतील पहिले अमिनो एसिड तयार होत नाही शिवाय या सल्फर शिवाय साखळीची घडी देखील होत नाही.
सल्फर हा ज्वालामुखीच्या मुखातून जन्म घेतो, याला आपण मराठी मध्ये गंधक म्हणतो. निसर्गतहा आढळणारे हे मूलद्रव्य शेतीत वापरण्यापूर्वी बारीक करावे लागते. गहू दळायच्या चक्की प्रमाणे चक्कीत यांची भुकटी बनवल्यावर यातील प्रत्येक कणाचे 8 ते 10 हजार तुकडे करावे लागतात ज्याला आपण "सूक्ष्मगंधक" म्हणतो. फुलोरा अवस्थेत हा सूक्ष्मगंधक दिल्यास, घाट्यातिल दाणे चांगले भरले जातात, ते टपोरे बनतात. एकूणच उत्पादन भरगोस येते.
पाटील बायोटेक चे रिलीजर म्हणजे अतिसूक्ष्म गंधक. याचा उपयोग भूसुधारक, खत, बुरशीनाशक व कोळी नाशक म्हणून देखील होतो. रिलीजर - एक नाम, चार काम!
या चर्चेतून आपल्या लक्षात येते की हयूमिक एसिड, कॅल्शियम नायट्रेट खत व सूक्ष्म गंधक ही तीन खते, हरभरा टपोरा होऊन, भरगोस उत्पादन येण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.
या दृष्टिकोनातून पाटील बायोटेकची अमृत ड्रेचिंग किट हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अनन्यसाधारण पणे बहुउपयोगी आहे. या किट मध्ये उच्च दर्जाचे, परखलेले घटक आहेत. या किट मध्ये हयुमॉल, कॅलनेट व रिलीजर ही तीन उत्पादने एकत्र दिली गेली असून त्यात अनुक्रमे हयुमिक एसिड, कॅल्शियम नायट्रेट खत व सूक्ष्मगंधक उपलब्ध होतात. एका एकर साठी एक किट पुरेशी ठरते. ही किट गेली 15 वर्षे सातत्याने उपलब्ध करून दिली जाते आहे व लाखों शेतकरी बांधवानी या दर्जेदार उत्पादनाचा अनुभव घेतला आहे. त्यांचा के अनुभव आहे? ते आपण खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
अमृत ड्रेचिंग किट सर्व नामांकित कृषि केंद्रात उपलब्ध असून आपण ही किट ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. त्याची लिंक इथे देत आहे.
दहा हजारच्या वरील खरेदीवर 15 टक्के सूट मिळते व आपण खरेदी केलेली उत्पादने घरपोच पाठवली जातात. ठिकाणानुसार भारताच्या कानाकोपऱ्यात उत्पादन सात दिवसाच्या आत पोहोचते. वर दिलेल्या ऑफर चे तीन सेट घेतल्यास आपल्याला ही किट चांगल्या ऑफर मध्ये मिळेल.
विविध लेखांच्या व व्हीडीओच्या माध्यमातून पाटील बायोटेक शेतकरी बांधवांना रंजक व उपयोगी माहिती पोहोचवते. ही माहिती नियमित पणे मिळवण्यासाठी आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद!